महत्वाच्या सुचना :
1.Transfer Portal मध्ये केंद्रप्रमुख म्हणजेच Cluster Login उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. 2.आंतरजिल्हा बदली फॉर्म भरण्यापूर्वी शिक्षकांनी आपल्या Teacher Login मधील General Details या फॉर्म मध्ये माहिती भरून Cluster Login ला Forward करावी .त्यानंतर सदर माहिती केंद्रप्रमुखाकडून बदली प्रणालीच्या Cluster Login मधून Verify करून घ्यावी.त्यानंतरच शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीचा फॉर्म भरता येईल. 3.शाळेच्या मुख्याध्यापकांसाठी Transfer Portal मध्ये School Login उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.Staff Portal मधील Headmaster Login चा ID व Password चा उपयोग करून Transfer Portal मधील School Login करावे. 4.School Login मध्ये शाळेतील सर्व शिक्षकांचे Staff ID बाबत Report उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.आपला Staff ID जाणून घेण्यासाठी शिक्षकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांची संपर्क साधावा. 5.Transfer Portal मध्ये शिक्षणाधिकारी (EO) Login उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. 6.चुकलेली माहिती दुरुस्त करण्यासाठी शिक्षकांनी पाठवलेली Request शिक्षणाधिकारी Login मधून Verify करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 7.नवीन शाळेत रुजू झालेले परंतु अद्यापपर्यंत Online नोंद न झालेल्या शिक्षकांनी Join New School या सुविधेअंतर्गत नविन शाळेत Attach करून घेण्यासाठी पाठविलेल्या Request ला Verify करण्याची सुविधा शिक्षणाधिकारी (EO) Login ला देण्यात आलेली आहे.