संस्था व मुख्याध्यापक यांचेकरिता सूचना
दिनांक ०७/०७/२०२२
१९६ खासगी व्यवस्थापनातील शिक्षक पदभरती प्रक्रिये साठी कृपया https://mahateacherrecruitment.org.in या संकेत स्थळावर भेट द्यावी.
-------*******-------
दिनांक १० /०३/२०२२
दिनांक ९/३/२०२२ रोजी पोर्टलवर दिलेल्या सूचना क्रमांक ४ मध्ये मुख्याध्यापक यांच्या लॉगिन वरून करावयाच्या कार्यवाहीबाबत नमूद केलेले आहे.याबाबत स्पष्ट करण्यात येते की, सदर लॉगिनसाठी मुख्याध्यापकांनी शाळेचा यूजर आयडी म्हणून udise code वापरावा व शाळेच्या स्कूल पोर्टलचा असलेला पासवर्ड हा या लॉगिन साठी पासवर्ड म्हणून वापरावा.
-------*******-------
संस्था व मुख्याध्यापक यांचेकरिता सूचना
दिनांक ०९ /०३/२०२२
मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या ५६१ व्यवस्थापनांच्या २०६२ रिक्त पदांसाठी पोर्टल मार्फत दिनांक २/९/२०२१ रोजी पात्र उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस करण्यात आलेली आहे. अनुदानित पदांवर निवड होऊन शाळेत रुजू झालेल्या उमेदवारांचे वेतनाबाबत संस्थांनी खालीलप्रमाणे कार्यवाही करावी.
१. मुलाखत व अध्यापन कौशल्याच्या आधारे संस्थेने नियमानुसार निवड करून अनुदानित पदांवर नियुक्ती दिलेल्या उमेदवारांचे नियमित वेतन सुरू करण्यासाठी त्यांच्या नावाचा समावेश शालार्थ या वेतन प्रणालीमध्ये करावयाचा आहे .
२. यासाठी संबंधित संस्थांनी पोर्टल वरील Applicant Interview Status मधील सर्व नोंदी verify कराव्यात. त्यानंतर Lock Interview Status Details (Round1) लॉक करावे. संस्थेने Applicant Interview Status लॉक केल्यानंतर पुन्हा अनलॉक करता येणार नाही त्यामुळे नोंद केलेली माहीती योग्य असल्याची खात्री करूनच Lock Interview Status Details (Round1) लॉक करावे.
३. Applicant Interview Status लॉक केलेल्या संबंधित संस्थांनी उमेदवारांना ज्या शाळेत नियुक्ती आदेश दिलेले आहेत त्याबाबतची माहिती पोर्टलवर नोंद करावी. सदर नोंद करण्यासाठी संस्था लॉगिनवर Applicant Jointing Details (Round 1) हा मेनू उपलब्ध करण्यात आलेला आहे.
४. संस्थांनी अशी नोंद केल्यानंतर मुख्याध्यापकांच्या लॉगिनवर संबंधित उमेदवारांची नावे दिसतील. यासाठी मुख्याध्यापकांना पोर्टलवर नव्याने लॉगिन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. अशा उमेदवाराबाबत मुख्याध्यापकांनी Applicant Joining Status या मेनूतील Applicant Joining Details वर क्लिक करावे व त्यातील दिसत असलेल्या उमेदवारांचे नाव निवडावे त्यानंतर उमेदवारांबाबत Joined/Not Joined अशी योग्य ती नोंद करावी. Joined अशी नोंद केलेल्या उमेदवारांचे वेतन सुरू करण्यासाठी उमेदवारांची आवश्यक माहिती पोर्टल वर मुख्याध्यापक नोंद करतील.
५. शाळेच्या मुख्याध्यापकांनी उमेदवारांच्या आवश्यक माहितीची योग्य नोंद केल्यानंतर submit यावर क्लिक करावे. पोर्टलकडील माहिती शालार्थ पोर्टलकडून import करण्यात येईल व त्यानंतर संबंधित शिक्षकांचा शालार्थ क्रमांक हा शालार्थ पोर्टलकडून Generate होईल.
६. संबंधित शिक्षकांचा शालार्थ क्रमांक Generate झाल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक सदर शिक्षकाचे नाव संबंधित Bill Group मध्ये add करून वेतन सुरू करण्याबाबतची कार्यवाही करतील.
७. शाळेत रुजू न झालेल्या उमेदवाराबाबत संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी Not Joined अशी नोंद केलेली आहे अशा रिक्त पदावर संस्थेस विषय व आरक्षण विचारात घेऊन गुणवत्तेनुसार प्रतिक्षेतील (Waitlisted Candidate) पुढील पात्र उमेदवारास नियुक्ती आदेश देता येतील. अशा उमेदवारांच्या निवडीबाबत नोंद करण्याची सुविधा संस्था लॉगिनला लवकरच देण्यात येईल.
-------*******-------
संस्थांसाठी सूचना
दिनांक २८/०१/२०२२
१. पोर्टलमार्फत दिनांक २/९/२०२१ रोजी मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखतीनंतरची स्थिती नोंद करण्याची सूविधा व्यवस्थापनांना त्यांच्या लॉगीनवर देण्यात आलेली आहे. तथापि अद्यापही काही व्यवस्थापनानी सदरच्या नोंदी पूर्ण केलेल्या नाहीत. सदरच्या अपूर्ण नोंदी पूर्ण कराव्यात.
२. काही व्यवस्थापनांनी उमेदवारांच्या निवडीबाबतची चुकीची माहिती नोंद करून ती verified केली आहे. अशी verified केलेली चुकीची नोंद दुरुस्त (Unverify ) करण्यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी यांच्याकडे online request करण्याची सुविधा दिलेली आहे. सदर सुविधेबाबतचे User Manual (User Manual to correct wrongly verified data या नावाने ) संस्था लॉगीनवर देण्यात येत आहे. तसेच संबंधित शिक्षणाधिकारी यांना सुद्धा याबाबतचे User Manual त्यांच्या ई-मेल वर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. या User manual मध्ये नमूद केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करून उमेदवारांच्या मुलाखतीनंतरची योग्य नोंद करण्याची कार्यवाही पूर्ण करावी.
३. सदरच्या आवश्यक नोंदी पूर्ण करण्यासाठी व्यवस्थापनांना दिनांक १५/२/२०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
-------*******-------
दिनांक २३/१२/२०२१
१. पवित्र पोर्टल मार्फत मुलाखतीसाठी शिफारस केलेल्या सर्व उमेदवारांची पोर्टल वर मुलाखतीबाबत नोंद करण्याची सुविधा व्यवस्थापनाच्या लॉगिनवर दिनांक १७/१२/२०२१ पासून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर कार्यवाही बाबतचा संपूर्ण तपशील user manual for interview status म्हणून होम पेजवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
२. पवित्र पोर्टल मार्फत मुलाखतीसाठी शिफारस केलेल्या सर्व उमेदवारांची मुलाखतीनंतर नोंद केलेली माहिती ( उदा . Selected,Waitlisted,Rejected,Absent ) नुसार तयार होणारा अहवाल याद्वारे व्यवस्थापनाच्या लॉगिन वर उपलब्ध करून देण्यात येत आहे.
३. हा अहवाल डाऊनलोड करून प्रसिद्ध करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
४. अहवाल डाऊनलोड करण्यासाठी व्यवस्थापनाच्या लॉगिन वर Report या टॅब मध्ये Applicants Status After Interview General List (As per Interview Marks) हा मेनू दिसेल . या मेनूवर क्लिक केल्यानंतर खालील दोन प्रकारचे अहवाल उपलब्ध होतील.
General List as per Interview Marks
Postwise and Subjectwise List as per Interview Marks
५. (अ) General List as per Interview Marks यावर क्लिक केल्यानंतर मुलाखतीनंतरची सर्व उमेदवारांची General List दिसेल.
(ब) Postwise and Subjectwise List as per Interview Marks Marks यावर क्लिक केल्यानंतर मुलाखतीनंतरची सर्व उमेदवारांची Postwise and Subjectwise List दिसेल.
६. वरील पैकी कोणताही अहवाल डाउनलोड करण्यापूर्वी सर्व उमेदवारांची Verify/Return Applicant Details या सब मेनूतील माहिती verify केलेली असणे आवश्यक आहे.
७. वरील प्रमाणे कार्यवाही करताना अडचणी येत असल्यास edupavitra@gmail.com या ईमेल वर संपर्कासाठी मोबाईल नंबर सह स्क्रीन शॉट ईमेल पाठवावा.
-------*******-------
दिनांक १७/१२/२०२१
१. पवित्र पोर्टल मार्फत यापूर्वी मुलाखतीसह पद भरतीच्या कार्यवाही बाबत पोर्टल वरील दिनांक ०२/०९/२०२१, २४/०९/२०२१, ०८/१०/२०२१,२८/१०/२०२१ व २९/११/२०२१ रोजीच्या सुचनांचे अवलोकन करावे. पवित्र पोर्टलवर दिलेल्या जाहिरातीनुसार विषय,बिंदूनामावली व पवित्र पोर्टल मार्फत शिफारस झालेल्या उमेदवारांचा प्रवर्ग व वर नमूद केलेल्या यापूर्वीच्या सर्व सूचनांचे अनुपालन करून उमेदवार निवडीची कार्यवाही करण्याबाबत कळविण्यात आलेले होते. त्यानुसार व्यवस्थापनांना मुलाखत व अध्यापन कौशल्याची कार्यवाही करून पोर्टल मार्फत शिफारस केलेल्या सर्व उमेदवारांची नोंद पोर्टल वर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. परंतु तांत्रिक अडचणीमुळे नोंद करण्याची सुविधा देता आली नाही.
२. याद्वारे पोर्टल मार्फत मुलाखतीस शिफारस केलेल्या सर्व उमेदवारांची पोर्टलवर मुलाखतीबाबत (Interview Status) नोंद करण्याची सुविधा व्यवस्थापनाच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. पोर्टल मार्फत मुलाखतीसाठी शिफारस केलेल्या सर्व उमेदवारांची नोंद व्यवस्थापनाने पोर्टलवर दिनांक २४/१२/२०२१ पर्यंत पूर्ण करावी.
३. व्यवस्थापनाने लॉगीन केल्यानंतर Applicant Interview Status या Menu मध्ये खालील प्रमाणे Sub Menu दिसतील.
1) Applicant Interview Details
2) Verify/Return Applicant Details
४. व्यवस्थापनाने वरील पैकी Applicant Interview Details या submenu वर क्लीक केल्यानंतर मुलाखतीबाबत (Interview Status) सविस्तर तपशील नोंद करावा.
५. यानंतर Verify/Return Applicant Details वर क्लीक करावे. तेथे Verify व Return असे दोन बटण दिसतील. नोंद केलेला तपशील अचूक असल्यास Verify या बटनावर क्लीक करावे. नोंद केलेल्या तपशीलामध्ये त्रुटी असल्यास Return या बटनावर क्लीक करून उमेदवारांचा सविस्तर तपशील पुन्हा नोंदवावा.
६.सविस्तर तपशिलासाठी संस्थेने user manual for interview status पहावे. सदर user manual व्यवस्थापनाच्या लॉगिनच्या होम पेज वर उपलब्ध आहे.
-------*******-------
दिनांक २९/११/२०२१
१. मुलाखतीसह पद भरतीमध्ये इयत्ता ६ वी ते इयत्ता १२ वी गटातील रिक्त पदांसाठी पवित्र पोर्टल वर उमेदवारांची अंतीम निवड व्यवस्थापनाकडून करण्यात येत आहे. व्यवस्थापनांना मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी दिनांक ३१/१०/२०२१ पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. त्यानुसार व्यवस्थापनांकडून पदभरतीची कार्यवाही त्यांच्या स्तरावर पूर्ण झालेली आहे.
२. व्यवस्थापनांना दीपावली सुट्ट्यामध्ये निवड यादी अंतिम करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. नियुक्तीसाठी निवडलेल्या उमेदवारांना दिवाळी सुट्टीनंतर प्रत्यक्ष रुजू होण्यासाठी नियुक्ती आदेश देण्याबाबत पोर्टलवर दिनांक २८/१०/२०२१ रोजी सूचना देण्यात आलेल्या आहेत.
३. व्यवस्थापनांना मुलाखत व अध्यापन कौशल्याची पवित्र पोर्टलवर नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत तांत्रिक अडचणी येत आहेत याची व्यवस्थापनांनी नोंद घ्यावी.
४. ज्या व्यवस्थापनांनी अद्यापही नियुक्ती आदेश दिलेले नाहीत, त्या सर्व व्यवस्थापनांनी नियुक्ती देण्यात येत असलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी संबंधित शिक्षणाधिकारी यांच्याकडून करूनच तात्काळ नियुक्ती आदेश द्यावेत.
५. उमेदवार प्रत्यक्ष शाळेत रुजू झाल्यानंतर रुजू अहवाल व नियुक्ती आदेशाची नोंद करण्याची सदरची सुविधा लवकरच संस्था लॉगीनवर कार्यान्वित करण्यात येईल. संस्थांनी रुजू अहवाल नोंद केल्यानंतर रुजू झालेल्या शिक्षण सेवक यांना नियमित वेतन होण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये नोंद करण्यात येईल.
-------*******-------
दिनांक २८/१०/२०२१
१. मुलाखतीसह पद भरतीमध्ये इयत्ता ६ वी ते इयत्ता १२ वी गटातील रिक्त पदांसाठी पवित्र पोर्टल वर उमेदवारांची अंतीम निवड व्यवस्थापनाकडून होईल. त्यासाठी व्यवस्थापनांना दिनांक ३१/१०/२०२१ पर्यंत मुदत आहे. उमेदवारांची निवड यादी पोर्टलवर नोंद करणे संस्थांना अनिवार्य आहे. सदरची सुविधा लवकरच संस्था लॉगीनवर कार्यान्वित करण्यात येईल. तथापि, काही संस्थांनी तत्पूर्वीच उमेदवारांना नियुक्ती आदेश दिलेले आहेत. त्यामुळे अन्य संस्थांना देखील सर्व उमेदवारांच्या मुलाखती झाल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना आपल्या स्तरावरून नियुक्ती आदेश देता येतील व त्याप्रमाणे पोर्टलवर निवड यादीची नोंद करता येईल.
२. सर्वच व्यवस्थापनाच्या निवड याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर एकापेक्षा अधिक ठिकाणी निवड होणाऱ्या उमेदवारास एका ठिकाणी रुजू होण्याचा योग्य तो निर्णय घेता येईल.
३. दिवाळी सुट्ट्या दि २८/१०/२०२१ ते १०/११/२०२१ या कालावधीत आहेत. दिवाळी सुट्टीनंतर रुजू होण्याबाबत उमेदवारांना योग्य तो निर्णय घेता येईल.
-------*******-------
दिनांक ०८/१०/२०२१
१. मुलाखतीसह पदभरती या प्रकारात दि.२/९/२०२१ रोजी मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस केलेल्या उमेदवारांची यादी पोर्टल प्रसिद्ध करण्यात आली आहे . या उमेदवारांची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीची अंतीम मुदत दि १४/१०/२०२१ अशी कळविण्यात आलेली होती. राज्यातील काही भागांमध्ये पूर परिस्थिती /इतर नैसर्गिक अडचणीबाबत काही संस्था व उमेदवारांची विनंती लक्षात घेता सदरची मुदत दि ३१/१०/२०२१ पर्यंत वाढविण्यात येत आहे.
२. सर्व पात्र उमेदवारांना मुलाखत/अध्यापन कौशल्याबाबतची संधी देऊन ज्या व्यवस्थापनांकडून निवड प्रक्रियेची कार्यवाही पूर्ण झाली आहे त्यांनी पोर्टलवर देण्यात येणाऱ्या मेनूमध्ये योग्य ती माहिती नमूद करून अंतीम निवड यादी पोर्टल मार्फत प्रसिद्ध करावी.
३. मुलाखत/अध्यापन कौशल्याबाबतची कार्यवाही पूर्ण झालेल्या संस्थांनी उमेदवारांची निवड यादी पोर्टल नोंद करणे अनिवार्य आहे. सदरची सुविधा लवकरच संस्था लॉगीनवर कार्यान्वित करण्यात येईल.
-------*******-------
दिनांक २४/०९/२०२१
१.पवित्र पोर्टल वरील जाहिरातीमध्ये "मुलाखतीसह पदभरती" पर्याय दिलेल्या व्यवस्थापन /संस्थांपैकी SEBC प्रवर्गासाठी जागा उपलब्ध आहेत परंतू खुला(समांतर आरक्षणाशिवाय) प्रवर्गासाठी जागा उपलब्ध नाहीत, अशा १९६ व्यवस्थापनांना मुलाखतीसाठी दिनांक २/९/२०२१ रोजीच्या शिफारस पात्र यादीमध्ये उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली नाही.
२. अशा १९६ व्यवस्थापनांची यादी उमेदवार व संस्था यांना पोर्टलवरील 196 Management list या मेनूवर क्लीक केल्यानंतर डाऊनलोड (उपलब्ध ) होईल.
३. शालेय शिक्षण विभागाचे पत्र दि ८/७/२०२१ मध्ये नमूद केल्यानुसार नुसार SEBC प्रवर्गातील उपलब्ध जागा EWS/GENERAL यापैकी योग्य त्या प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यात येत आहेत.
४. या १९६ व्यवस्थापनांसाठी सर्वच उमेदवारांकडून नव्याने स्वतंत्रपणे प्राधान्यक्रम घेण्यात येणार आहेत. त्यानंतर या व्यवस्थापनांना मुलाखतीसाठी १:१० या प्रमाणात (उपलब्धतेनुसार) उमेदवार उपलब्ध करून दिले जातील.
५. या १९६ व्यवस्थापनांना सध्या लॉगीन उपलब्ध नाही.
६.पवित्र पोर्टल वर दि २/९/२०२१ रोजी दिलेल्या सूचना क्र १६ मध्ये नमूद केल्यानुसार काही उमेदवारांकडून गैरसमजुतीने वा चुकीने स्व प्रमाणपत्रात चुकीची माहिती भरलेली असल्यामुळे या माहितीमध्ये बदल करण्याची उमेदवारांकडून मागील २ वर्षापासून सातत्याने होत असलेली विनंती लक्षात घेता अशा उमेदवारांना तसा योग्य तो बदल करण्याची सुविधा दि २४/९/२०२१ ते ०३/१०/२०२१ या कालावधीसाठी देण्यात येत आहे.
७. मुलाखतीसह निवडप्रक्रियेसाठी दि २/९/२०२१ रोजी प्रसिद्ध केलेल्या शिफारस यादीतील उमेदवारांची शिफारस ही पूर्वीच्या verified स्व प्रमाणपत्राच्या आधारे केलेली असल्याने दि २/९/२०२१ च्या निवडप्रक्रियेसाठी सुधारीत (Updated) स्व प्रमाणपत्र विचारात घेतले जाणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
८. व्यवस्थापन/संस्था यांना येणाऱ्या अडचणींबाबत संबंधीत शिक्षणाधिकारी यांचेशी संपर्क साधता येईल.
-------*******-------
दिनांक ८/०९/२०२१
१)पवित्र पोर्टल वर दि २/९/२०२१ रोजी प्रसिद्ध केलेल्या मुलाखतीसह पदभरतीकरीता मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस केलेल्या यादीमध्ये उमेदवारांना त्यांचे काही प्राधान्यक्रम दिसत नाहीत, त्याची कारणे खालील प्रमाणे आहेत.
अ) SEBC प्रवर्गासाठी जागा असणाऱ्या व्यवस्थापनांपैकी ज्या व्यवस्थापनांकडे जाहिरातीमध्ये खुला(समांतर आरक्षणाशिवाय) प्रवर्गासाठी जागा नाहीत अशा १९६ व्यवस्थापनांचा समावेश
करण्यात आलेला नाही. या व्यवस्थापनाची यादी उमेदवारांना पोर्टलवरील 196 Management list या मेनूवर क्लीक केल्यानंतर डाऊनलोड (उपलब्ध ) होईल.
आ) नियुक्ती प्राधिकारी म्हणून ज्या व्यवस्थापनांनी पवित्र पोर्टलवर जाहिरात दिलेली होती, परंतु या व्यवस्थापनांनी पोर्टल मार्फत पदभरती न करण्याबाबत विविध प्रशासकीय कारणे
पदभरतीच्या प्रक्रियेपूर्वी आगाऊ कळविले असल्याने अशा १४ व्यवस्थापनांच्या ४२ पदांसाठी उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात आलेली नाही. या व्यवस्थापनाची यादी
उमेदवारांना पोर्टल वर 42 Post in 14 Management list या मेनूवर क्लीक केल्यानंतर डाऊनलोड (उपलब्ध ) होईल.
इ) इयत्ता १ ली ते इयत्ता ५ वी या गटातील जाहिरातीतील एकूण ३८१ पदे रिक्त आहेत. इयत्ता १ ली ते इयत्ता ५ वी या गटातील पदांबाबत मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे प्रकरण
न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे इयत्ता १ ली ते इयत्ता ५ वी या गटातील ३८१ रिक्त पदांसाठी उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात आलेली नाही.
२)मुलाखतीसह पदभरतीमध्ये SEBC प्रवर्गासाठी जागा असणाऱ्या व्यवस्थापनांपैकी ज्या व्यवस्थापनांकडे जाहिरातीमध्ये खुला(समांतर आरक्षणाशिवाय) प्रवर्गासाठी जागा नाहीत अशा १९६ व्यवस्थापनांच्या SEBC प्रवर्गातील जागा EWS/GENERAL या प्रवर्गामध्ये वर्ग करून त्या जाहिरातीतील सर्वच रिक्त पदांसाठी पात्र उमेदवाराकडून नव्याने प्राधान्यक्रम घेण्यात येतील.
3)या १९६ व्यवस्थापनांतील रिक्त पदांसाठी प्राधान्यक्रम घेण्याबाबत पोर्टलवर स्वतंत्रपणे सूचना देण्यात येतील. दिलेल्या मुदतीत उमेदवारांनी प्राधान्यक्रम GENERATE करून LOCK करणे आवश्यक राहील.
-------*******-------
दिनांक २ /०९/२०२१
१ ) पवित्र पोर्टल मार्फत यापूर्वी मुलाखतीशिवाय पदभरतीसाठीची कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली आहे. आता मुलाखतीसह पद भरतीची कार्यवाही करण्यात येणार आहे.
२ ) मुलाखतीसह पदभरतीमध्ये इयत्ता १ ली ते इयत्ता ५ वी या गटातील जाहिरातीतील एकूण ३८१ पदे रिक्त आहेत. इयत्ता १ ली ते इयत्ता ५ वी या गटातील पदांबाबत मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे इयत्ता १ ली ते इयत्ता ५ वी या गटातील ३८१ रिक्त पदांसाठी मा. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.
3 ) मुलाखतीसह पद भरतीमध्ये इयत्ता ६ वी ते इयत्ता १२ वी गटातील रिक्त पदांसाठी कार्यवाही करण्यात येत आहे.
4 ) शालेय शिक्षण विभाग,मंत्रालय मुंबई यांचे पत्र दि ८/७/२०२१ नुसार SEBC प्रवर्गातील जागा EWS/GENERAL यापैकी योग्य त्या प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यात येत आहेत.
5 ) मुलाखतीसह पद भरतीच्या जाहिरातीमध्ये SEBC या प्रवर्गासाठी जागा असणाऱ्या व्यवस्थापनापैकी ज्या व्यवस्थापनाच्या जाहिरातीमध्ये खुला (समांतर आरक्षणाशिवाय) प्रवर्गासाठी जागा उपलब्ध होत्या, त्या ८२ व्यवस्थापनांसाठी सर्वच उमेदवारांनी प्राधान्यक्रम दिलेले आहेत. या ८२ व्यवस्थापनांतील SEBC प्रवर्गाचे पदे EWS/GENERAL या प्रवर्गामध्ये वर्ग होत असतील तरी उमेदवारांचे प्राधान्यक्रम पुर्वीच खुल्या प्रवर्गासाठी जाहिरात असल्याने पोर्टलवर उपलब्ध आहेत.
6)या ८२ व्यवस्थापनांचे स्वतंत्र प्राधान्यक्रम न घेता या ८२ व्यवस्थापनासह अन्य नव्याने प्राधान्यक्रम घेण्याची आवश्यकता नसणाऱ्या उर्वरीत व्यवस्थापनांच्या मुलाखतीसह पद भरतीसाठी कार्यवाही करण्यात येत आहे.
7)अशा रीतीने एकूण ५६१ व्यवस्थापनांच्या २०६२ रिक्त पदासाठी आज दिनांक २/९/२०२१ रोजी मुलाखतीसह पद भरतीसाठी शिफारस करण्यात येत आहे.
8)या व्यवस्थापनांना मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एका जागेकरीता १:१० या मर्यादेत ( समांतर आरक्षणासह व उमेदवार उपलब्धतेच्या मर्यादेत ) उमेदवार उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
9)मुलाखत व अध्यापन कौशल्य बाबतची कार्यवाही व्यवस्थापनांकडून दिनांक १३/०९/२०२१ ते दिनांक १४/१०/२०२१ या कालावधीत करण्यात येईल.
10)उमेदवाराने लॉगीन केल्यानंतर गुणवतेनुसार उमेदवार ज्या जास्तीत जास्त १० प्राधान्यक्रमावर मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी पात्र ठरले असेल त्या व्यवस्थापनांची यादी Reports- Interview Recommendation Status - View Recommended Institutes List या बटन वर क्लिक केल्यानंतर दिसेल व संस्थेच्या नावासमोरील शेवटच्या रकान्यातील VIEW वर क्लिक केल्यानंतर सबंधित व्यवस्थापनासाठी संपर्काचा तपशील दिसेल. त्यानुसार आपण पात्र ठरलेल्या संस्थेकडे पुढील कार्यवाहीसाठी संपर्क साधावा.
11)ज्या उमेदवाराची गुणवतेनुसार मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस झाली नाही, त्यांना Reports- Interview Recommendation Status - View Preferancewise Status या बटन वर क्लिक केल्यानंतर शिफारस न होण्याचे कारण दिसेल.
12)उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एकूण ३० गुण असतील, उमेदवारांची अंतीम निवड या ३० गुणाच्या आधारे व्यवस्थापनाकडून होईल.
13)मुलाखतीसह पद भरतीकरीता अधिकच्या माहितीसाठी पोर्टल वर अपलोड केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे वाचन करावे.
14)मुलाखतीसह पदभरतीमध्ये SEBC प्रवर्गासाठी जागा असणाऱ्या व्यवस्थापनांपैकी ज्या व्यवस्थापनांकडे जाहिरातीमध्ये खुला(समांतर आरक्षणाशिवाय) प्रवर्गासाठी जागा नाहीत अशा १९६ व्यवस्थापनांसाठी सर्वच उमेदवाराकडून नव्याने स्वतंत्रपणे प्राधान्यक्रम घेण्यात येतील. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत प्राधान्यक्रम GENERATE करून LOCK करणे आवश्यक राहील.
15)या १९६ व्यवस्थापनांच्या ७६९ रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम देण्यात येतील. या पूर्वी ज्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम LOCK केलेले आहेत त्यांना देखील प्राधान्यक्रम बदल /अपडेट करण्याची सुविधा दिली जाईल. जे उमेदवार प्राधान्यक्रम बदल करून LOCK करतील त्यांचे बदल केलेले प्राधान्यक्रम विचारात घेतले जातील. जे उमेदवार प्राधान्यक्रमामध्ये बदल करणार नाहीत त्यांचे पूर्वीचेच LOCK केलेले प्राधान्यक्रम विचारात घेतले जातील.
16)SEBC प्रवर्गातील जागा EWS/GENERAL या प्रवर्गामध्ये वर्ग होत आहेत. त्यामुळे १९६ व्यवस्थापनासाठी सर्वच उमेदवारांकडून नव्याने स्वतंत्रपणे प्राधान्यक्रम घेण्यात येणार आहेत. परंतु अनेक उमेदवारांकडून गैरसमजुतीने वा चुकीने स्व प्रमाणपत्रात चुकीची माहिती भरलेली असल्यामुळे माहितीमध्ये बदल करण्याची मागील २ वर्षापासून विनंती होत आहे. या परिस्थितीत बदलाची मागणी विचारात घेता अशा उमेदवारांना तसा योग्य बदल करण्याची सुविधा देण्यात येईल. याबाबतचा कालावधी पोर्टलवर कळविण्यात येईल.
17)उमेदवारांनी प्राधान्यक्रम LOCK केल्यानंतर लगेचच या १९६ व्यवस्थापनांना मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एका जागेकरीता जास्तीत जास्त १:१० या मर्यादेत ( समांतर आरक्षणासह व उमेदवार उपलब्धतेच्या मर्यादेत ) उमेदवार उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
18)गुणवतेनुसार जास्तीत जास्त १० प्राधान्यक्रमावर मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी उमेदवाराची पोर्टल मार्फत त्या त्या व्यवस्थापनांकडे शिफारस होणार आहे.
19)नियुक्ती प्राधिकारी म्हणून ज्या व्यवस्थापनांनी पवित्र पोर्टलवर जाहिरात दिलेली होती, परंतु या व्यवस्थापनांनी पोर्टल मार्फत पदभरती न करण्याबाबत विविध प्रशासकीय कारणे पदभरतीच्या प्रक्रियेपूर्वी आगाऊ कळविले असल्याने अशा १४ व्यवस्थापनांच्या ४२ पदांसाठी उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात आलेली नाही. अशा १४ व्यवस्थापनांच्या ४२ पदांसाठीची यादी माहितीसाठी पोर्टल वर देण्यात येत आहे.
20)निवड प्रक्रियेबाबत काही अडचणी असल्यास संबंधित विभागाच्या विभागीय शिक्षण उपसंचालकांशी संपर्क साधावा.
21)उमेदवारांना पवित्र पोर्टल च्या edupavitra@gmail.com वर संपर्क साधता येईल.
-------*******-------
दिनांक :- १८/०६/२०२१
१)पवित्र पोर्टल मार्फत रयत शिक्षण संस्था सातारा, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर व महात्मा फुले शिक्षण संस्था उरण जि सांगली व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या काही जागांवरील नियुक्तीसाठी दि १४/५/२०२१ रोजी उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे. अशा सर्व उमेदवारांना दि १५/०७/२०२१ पर्यंत संबंधित व्यवस्थापनाकडे संपर्क साधून आपली कागदपत्र पडताळणी करून घेण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. अशा शिफारस पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी यापूर्वी दिलेल्या सविस्तर सूचनांनुसार करून घ्यावी..
२)संबंधित व्यवस्थापनांनी देखील संबंधित उमेदवारांना कागदपत्र पडताळणी बाबत आपल्यास्तरवरून स्वतंत्रपणे कळविण्यात यावे.
३) कागदपत्र पडताळणी अंती निकषांची पूर्तता करणाऱ्या नियुक्तीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांना संबंधित व्यवस्थापनांनी पदे रिक्त असणाऱ्या शाळांवर नियुक्ती देण्याची कार्यवाही करावी.
-------*******-------
दिनांक :- १४/५/२०२१
१)पवित्र पोर्टल मार्फत मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या संस्थांतील इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी या गटातील नियुक्तीसाठी शिफारस पात्र उमेदवारांची दिनांक ७/२/२०२० रोजी यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर यादीतील उमेदवारांच्या नियुक्तीसाठी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांनी उमेदवारांची पात्रता पडताळणी करून पात्र असणाऱ्या उमेदवारांना नियुक्ती आदेश दिलेले आहेत. विहित मुदतीनंतर कागदपत्र पडताळणी मध्ये अपात्र ठरलेले,कागदपत्र पडताळणी साठी गैरहजर राहिलेले, नियुक्ती आदेश देऊनही विहित मुदतीत रुजू न झालेले उमेदवार अशा एकूण १९६ रिक्त जागांवर पवित्र पोर्टलमधील यादीतील गुणवत्तेनुसार उर्वरित पात्र उमेदवार संबंधित व्यवस्थापनाच्या मागणीनुसार उपलब्ध करून देण्यासाठी दि १४/५/२०२१ रोजी सदर राउंड घेण्यात आलेला आहे. पोर्टल वर यादी उपलब्ध आहे.
२)पोर्टल मार्फत नियुक्तीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीसाठी उमेदवारांचे स्व प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात येत आहे.
३)सदर जागांचा राऊंड रयत शिक्षण संस्था सातारा, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर व महात्मा फुले शिक्षण संस्था उरण जि सांगली या संस्थांसाठी झालेला असल्याने त्यानांच लॉगीन उपलब्ध होईल, इतर व्यवस्थापनास लॉगीन होणार नाही.
-------*******-------
दिनांक :- ०७/०२/२०२०
संस्थासाठी सूचना
१). मा.उच्च न्यायालय,खंडपिठ नागपूर येथील याचिका क्र ४०७९/२०१९ मध्ये दि २८/०८/२०१९ रोजी दिलेल्या निर्णयानुसार खाजगी संस्थेतील इ. ९ वी ते इ १२ वी या गटातील पदासाठी महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी (सेवेच्या शर्ती ) नियमावली १९८१ नुसार खाजगी माध्यमिक शाळेतील ( इ ९ वी ते इ १० वी) पदासाठी उत्तीर्ण आणि उच्च माध्यमिक शाळेतील ( इ ११ वी ते इ १२ वी) पदासाठी किमान व्दितीय श्रेणी असणा-या उमेदवारांना विचारांत घेऊन नव्याने प्रक्रिया करण्यात आलेली आहे.
२). मा. उच्च न्यायालय , खंडपिठ औरंगाबाद येथील याचिका क्र. ७९३८/२०१९ With C.A. ९९८/२०२० , याचिका क्र. ८००१/२०१९ With C.A. ८३०/२०२० व याचिका क्र. १२६०३/२०१९ मध्ये दिनांक ३१/०१/२०२० रोजी दिलेल्या निर्णयानुसार OBC या संवर्गासाठीची एक जागा वगळून इयत्ता ९ वी ते १२ वी या गटातील पदासाठी शिफारस पात्र ८३८ उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.
३). मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या १० खाजगी शैक्षणिक संस्थातील आरक्षण आणि रिक्त पदे यानुसार शिफारस पात्र उमेदवारांच्या संस्थानिहाय शिफारस पात्र उमेदवारांची यादी ((Graduate Teacher (9 to 12) Round-8)) आणि शासन परवानगी प्राप्त झाल्याने माजी सैनिक व अन्य शिल्लक समांतर आरक्षणातील (भूकंपग्रस्त) वगळता योग्य उमेदवार उपलब्ध झाले नाहीत अशी पदे त्या त्या प्रवर्गातील 'Pure' मध्ये रूपांतरित करून गुणवतेनुसार दुसरी शिफारस पात्र उमेदवारांची यादी ((Graduate Teacher (9 to 12) Converted Round-9)) प्रसिद्ध करण्यात येत आहे.
४). रयत शिक्षण संस्था सातारा, श्री स्वामी शिक्षण संस्था कोल्हापूर, महात्मा फुले शिक्षण संस्था इस्लामपूर ता. वाळवा जिल्हा सांगली या संस्थांच्या दोन याद्या ((Graduate Teacher (9 to 12) Round-8 And Graduate Teacher (9 to 12) Converted Round-9)) तर उर्वरित ७ संस्थाची शिफारस पात्र उमेदवारांची यादी ((Graduate Teacher (9 to 12) Round-8)) प्रसिद्ध करण्यात येत आहेत.
५). शिफारसपात्र उमेदवार नियुक्ती साठी दि १५/०२/२०२० पर्यंत संपर्क साधतील. या कालावधीत उमेदवारांच्या आवश्यक कागदपत्रांची पडताळणी इ कामे पूर्ण करून उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबतची कार्यवाही करावी.
६). उमेदवाराच्या कागदपत्राच्या पडताळणी बाबत यापूर्वी आपणास दि १३/०८/२०१९ रोजी सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत.
-------*******-------